दिल्लीत अण्णा हजारेंचे आजपासून आंदोलन

नवी दिल्ली – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे विविध मागण्यांसाठी आजपासून दिल्लीत आंदोलन करणार आहेत. रामलीला मैदानावरुन आंदोलनाला सुरुवात होणार आहे. स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव, जनलोकपालची अंमलबजावणी या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. अण्णांच्या या बेमुदत आंदोलनामुळे मोदी सरकारची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून अण्णा जनलोकपालच्या अंमलबजावणीसाठी आग्रही आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी त्यांनी विविध भागांचा दौरा केला. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. केंद्र सरकारशी वारंवार पत्रव्यवहार करूनही मार्ग न निघाल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे अणांनी म्हटले आहे. आंदोलनाला सुरुवात करण्यापूर्वी अण्णा महाराष्ट्र सदनहून राजघाटला जातील. महात्मा गांधींच्या समाधीस्थळावर आदरांजली अर्पण केल्यानंतर शहीद पार्ककडे रवाना होतील. शहीददिनी हुतात्म्यांना अभिवादन करतील. त्यानंतर रामलीला मैदानावर दाखल होणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)