दिल्लीतून होईल आघाडीचा निर्णय

सोमेश्वरनगर -जातीयवादी शक्‍तींचा पराभव करण्यासाठी आघाडी झालीच पाहिजे, अशी माझी शिफारस आहे. यासाठी दिल्लीतूनच निर्णय होईल. परंतु सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येऊन भाजपचा पराभव करण्याशिवाय गत्यंतर नाही, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

मुरूम (ता. बारामती) येथील कै. आनंदराव चव्हाण यांचे जुने सहकारी भीमराव नारायणराव शिंदे यांचे नुकतेच निधन झाले. यानिमित्ताने भेटीसाठी चव्हाण आले असताना उपस्थित शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. त्यांच्यासोबत रणजितराजे निंबाळकर, राजवर्धन शिंदे, अविनाश चव्हाण, शामकाका काकडे, रमणिक कोठडिया, महेश शिंदे उपस्थित होते. चव्हाण यांनी शिंदे कुटुंबियांशी संवाद साधला. यानंतर उपस्थितांशी ते मनमोकळेपणाने बोलत होते.

चव्हाण म्हणाले की, आघाडी शिवाय पर्याय नाही. मागील काळात कॉंग्रेस राष्ट्रवादी वेगळे लढले यामुळे सत्तावीस टक्‍के मते मिळूनही भाजप सत्तेवर आला. आम्ही एकत्र लढलो असतो तर चित्र वेगळे दिसले असते. आत्ता सर्व पक्षांनी केवळ राष्ट्रवादीच नव्हे तर सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येऊन भाजपचा मुकाबला केला पाहिजे. हे सरकार शेतकरी विरोधी आहे. आता साखर निर्यातीचा निर्णय घेतला परंतु यांनीच साखर आयात केली. आमच्या काळात कृषी मंत्रालय शरद पवार यांनी कौशल्याने सांभाळले. खाणारा व पिकवणाऱ्याला न्याय दिला. परंतु आता शेतकऱ्यांवर अन्याय सुरू आहे. सहकार चळवळ मोडून काढली जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)