दिल्लीतील संचलनात वाजणार “नीळकंठ मास्तर’ मधील वंदे मातरम

नगर: दरवर्षी प्रजासत्ताक दिना निमित्त भारतातील सर्व राज्य इंडिया गेट दिल्ली येथील 26 जानेवारी निमित्त संचलनात सहभागी होतात या संचलनात महाराष्ट्र प्रतिनिधित्व करीत असलेल्या देखाव्यात अक्षर फिल्म्स प्रा.लिमिटेड अहमदनगरची निर्मिति असलेल्या नीलकंठ मास्तर चित्रपटातील वंदे मातरम गीता चा समावेश करण्यात आला आहे अशी माहीती चित्रपटाचे निर्माते बलभीम पठारे व मेघमाला पाठारे यांनी दिली.

राजधानी दिल्लीत येत्या जानेवारीला होणाऱ्या राजपथ संचलनातील महाराष्ट्राच्या चित्ररथाला निळकंठ मास्तर या चित्रपटातील वंदे मातरम गाणे साथ करणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या चले जाव चळवळीवर आधारित चित्ररथ यंदा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विभागाने केला आहे. तो दिल्लीच्या संचलनात उतरल्यानंतर निळकंठ मास्तर चित्रपटातील वंदे मातरम गाणे अखंड वाजत राहणार आहे. अशी माहिती शशिकांत नजान यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कार्यावर आणि 1942 च्या चले जाव चळवळी वर आधारित कथा एक अविष्कार अनेक या धर्तीवर प्रत्येक राज्याने चित्ररथ (देखावे) सादर करावेत या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्य सादर करीत असलेल्या (चित्ररथात) देखाव्यात नीलकंठ मास्तर चित्रपटातील गीत सादर व्हावे या साठी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचलनालयाच्या संचालिका स्वाती काळे यांनी बलभीम पठारे यांना कळविले होते. होती.भारतीय चित्रपट सृष्टि मधे विविध भाषे मधून वंदे मातरम हे गीत सुमारे 42 ते 45 प्रकारे सादर झालेले आहे या सर्वातुन नीलकंठ मास्तर च्या गीताची निवड झाली हा एक प्रकार अहमदनगर चा बहुमान आहे अशी भावना बलभीम पठारे यांनी व्यक्त केली.

गजेंद्र आहिरे दिग्दर्शित या चित्रपटाचे संगीतकार अजय-अतुल असून आघाडीच्या 22 गायकांनी हे गीत गायले आहे. सदर गीत पारनेर तालुक्‍यातील सेनापती बापट यांच्या गावी तसेच संताजी धनाजी यांची समाधी असलेल्या कुरुंदवाड नरसोबाची वाडी कोल्हापुर येथे चित्रित करण्यात आले होते या चित्रिकरणात हत्ती ऊंट सह 400 कलाकारानी सहभाग नोंदविला आहे हे विशेष. तीन वर्षा पूर्वी अजय -अतुल यांच्या माऊली या गिताचा समावेश झाला होता.नीलकंठ मास्तर च्या या यशा बद्दल बलभीम आणि मेघमाला पठारे यांचें अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने शशिकांत नजान तसेच नाट्य परिषद मध्यवर्तीचे सहकार्यवाह सतीश लोटके, नगर शाखेचे अध्यक्ष अमोल खोले,माजी अध्यक्ष
संजय घुगे, सतीश शिंगटे,क्षितिज झावरे,अनंत जोशी,दिपक शर्मा जेष्ठ रंगकर्मी पी.डी. कुलकर्णी, श्रेणिक शिंगवी,दिपक घारू,सदानंद भणगे,मोहन सैद,रितेश सालुंके,शेखर वाघ, अनंत रिसे, संदीप दंडवते,जयंत येलूलकर,संजय आढाव अविनाश कराळे आदींनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)