इंधनाचा प्रकार ओळखण्यासाठीची उपाय योजना

नवी दिल्ली – वाहनामधील इंधनाचा प्रकार ओळखण्यासाठी होलोग्रामचे रंगीत स्टीकर वापरण्यास सर्वोच्च न्यायालयाने अनुमती दिली आहे. रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने या स्टीकरचा पर्याय सुचवला होता. फिकट निळ्या रंगाचे स्टीकर पेट्रोल आणि सीएनजीसाठी तर नारिंगी रंगाचे स्टीकर डीझेल वाहनांसाठी वापरले जातील, असे परिवहन मंत्रालयाने म्हटले आहे.

या स्टीकरचा वापर 30 सप्टेंबरपासून दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानीच्या परिसरातील वाहनांवर करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. याशिवाय इलेक्‍ट्रॉनिक आणि संकरीत वाहनांसाठी हिरव्या नंबर प्लेट वापरण्याचीही सूचना न्यायालयाने केली आहे. त्यावर विचार करून लवकरच निर्णय घेतला जाईल असे अतिरिक्‍त सॉलिसिटर जनरल ए.एन.एस. नाडकर्णी यांनी न्यायालयाला सांगितले.

प्रदूषणाच्या मुद्दयावर सर्वोच्च न्यायालयाच्या ऍमिकस क्‍युरी ऍड. अपराजिता सिंह यांनीही या रंगीत स्टीकरचा पर्याय पूर्वी सुचवला होता. दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानीच्या परिसरातील प्रदूषणाच्या संदर्भातल्या याचिकांवरील सुनावणीदरम्यान वाहनांमधील इंधन ओळखण्याची गरज व्यक्‍त करण्यात आली होती. त्यानुसार हा स्टीकरचा पर्याय पुढे आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)