दिल्लीतील नेमबाज स्पर्धेसाठी अरुण पाडुळे यांचा निवड चाचणीत समावेश

पिंपरी- पूर्णानगर येथील नेमबाज अरुण पाडुळे यांनी दिल्ली येथील 62 व्या राष्ट्रीय नेमबाज स्पर्धेमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात उल्लेखनीय कामगीरी केली. या कामगीरीच्या जोरावर इंडियन नॅशनल रायफल असोसिएशनतर्फे नियोजित भारतीय संघाच्या निवड चाचणीत त्यांचा समावेश झाला आहे. राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत पाडुळे यांनी 600 पैकी 563 गुण प्राप्त केले. दिल्ली येथेच 15 ते 18 मार्चपर्यंत भारतीय संघासाठी निवड चाचणी होणार आहे. महापालिकेतर्फे पिंपळे गुरव येथे झालेल्या महापौर चषक नेमबाजी स्पर्धेत 600 पैकी 559 गुण मिळवत सुवर्णपदकही पटकावले होते. बालेवाडी येथे पाडुळे हे स्वप्रशिक्षणावर सराव करतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)