दिल्लीतील निर्वासितांवर कारवाई करा – मनोज तिवारी यांची मागणी

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत रोहिंग्य आणि बांगलादेशी नागरीक घुसखोरी करून बेकायदेशीरपणे राहात आहेत त्यांच्यावर त्वरीत कारवाई केली जावी अशी मागणी दिल्ली प्रदेश भाजपचे नेते मनोज तिवारी यांनी केली आहे. तथापि दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने हे काम करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

या संबंधात आपण मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहीले आहे असे त्यांनी म्हटले आहे. तथापी हा विषय केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत आहे आणि गृहमंत्रालय हे भाजपच्या हातात आहे त्यामुळे तुम्ही तिथे का प्रयत्न करीत नाही असा प्रश्‍न पत्रकारांनी तिवारी यांना विचारला. त्यावर तिवारी म्हणाले की आम्ही राजनाथसिंह यांनाही ही मागणी केली आहे पण दिल्ली सरकारनेही ही जबाबदारी उचलली पाहिजे. हे बेकायदेशीर घुसखोर दिल्लीतील बेकायदेशीर तसेच गुन्हेगारी कामात गुंतलेले असतात असा आरोपही त्यांनी केला.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)