दिल्लीतील खासगी वाहनांचा वापर कमी करण्याची शिफारस

केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने दिल्लीबाबत सुचवल्या कडक उपाययोजना
नवी दिल्ली – राजधानी दिल्लीतील हवेच्या वाढत्या प्रदुषणांवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या टास्कफोर्सने खासगी वाहनांचा वापर मर्यादित करण्याची सुचना केली आहे. त्याखेरीज त्यांनी कोळसा आणि बायोमास उद्योग बंद करण्याचीही शिफारस केली आहे. लोकांनी प्रदुषित हवेपासून बचाव करण्यासाठी बाहेर फार फिरणे टाळावे अशी सुचनाही या टास्कफोर्सने केली आहे.

शुक्रवारी दिल्ली शहरातील हवा प्रदुषणाची स्थिती अत्यंत धोकादायक पातळीवर गेली होती. पुढील महिन्यात ही स्थिती आणखी धोकादायक होणार आहे असा ईशाराही या टास्कफोर्सने दिला आहे. या टास्कफोर्सने एका बैठकीत संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना या धोक्‍याच्या स्थितीची जाणिव करून दिली. या बैठकीला पर्यावरण मंत्रालय, हवामान खाते, उत्तरप्रदेशचे प्रदुषण नियंत्रण मंडळ, हरियानाचे प्रदुषण नियंत्रण मंडळ दिल्ली तसेच केंद्र सरकारच्या प्रदुषण नियंत्रण यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हवामान खात्याचे प्रतिनिधी सिद्धार्थ सिंग यांनी सांगितले की सध्याच दिल्लीची हवा खूप प्रदुषित झाली असून यापुढील काळात ती आणखी प्रदुषित होणार असल्याने त्याविषयी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. दिल्लीतील वाहनांचे प्रमाण आणि प्रदुषण करणाऱ्या कंपन्या व उद्योगांवर कडक उपाययोजना केली पाहिजे. हवा प्रदुषण करणाऱ्या प्रकल्पांवर बंदीच घातली पाहिजे असेही या टास्कफोर्सने सुचवले. खाणकाम, बांधकामे, स्टोन क्रशर, हॉटमिक्‍स प्लान्ट इत्यादी प्रकल्प बंद करण्याची शिफारसही त्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)