दिल्लीच्या भक्ताकडून साईंना दीड किलो वजनाचा सुवर्णहार

शिर्डी – दिल्लीच्या साईभक्ताने साईबाबांच्या चरणी दीड किलो वजनाचा 41 लाख 94 हजार रुपयांचा सुवर्णहार आज साईबाबांच्या चरणी अर्पण केला आहे.
साईसमाधी शताब्दी वर्षात देश-विदेशातील साईभक्त दर्शनासाठी शिर्डीत येत आहे. दिवसेंदिवस साईंचा महीमा वाढत असून साईच्या झोळीत भरभरून दान येत असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी दिल्ली येथील एका साईभक्ताने तब्बल दीड किलो वजनाचा सुमारे 41 लाख 94 हजार रुपये किंमतीचा सुवर्णहार साईचरणी दान केला, अशी माहिती साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली. या वेळी उपजिल्हाधिकारी मनोज घोडे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, मंदिर प्रमुख राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते. मध्यान्ह आरती दरम्यान हा हार साईबाबांच्या मूर्तीला घालण्यात आला होता. उत्सवा दरम्यान बाबांना हार घालण्यात येणार आहे. साईबाबांना मोठया प्रमाणात सोने-चांदीचे दान येत आहेत. भक्तांची दर्शनासाठी गर्दी वाढत असून दानात वाढ होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)