दिल्लीच्या निजामुद्दीन दर्ग्यात महिला प्रवेशाची मागणी 

दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

नवी दिल्ली – मुंबईच्या हाजीअली दर्ग्यात आणि केरळच्या शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेशाचा समान अधिकार देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता दिल्लीच्या निजामुद्दीन औलिया दर्ग्यातही महिलांना प्रवेश देण्याची मागणी होत आहे. यासंबंधी दिल्ली उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ज्यामध्ये महिलांना दर्ग्यात आतल्या खोलीपर्यंत जाण्याची परवानगी देण्याची विनंती करण्यात आली आहे.

ही याचिका कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थीनीने दाखल केली आहे. या याचिकेत केंद्र आणि संबंधित प्रशासनाला या दर्ग्यात महिलांना प्रवेशाचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांचा दावा आहे की, या दर्ग्याच्या बाहेर एक नोटीस लावण्यात आली आहे. यामध्ये महिलांना “प्रवेश बंद’ असे लिहिले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे की, याबाबत संबंधित प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी यावर कोणतेही उत्तर दिलेले नाही. महिलांना येथे प्रवेश नाकारणे हे असंविधानिक असल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे. तसेच यासंबंधी अजमेर शरीफ, हाजीअली दर्ग्याचे उदाहरण समोर ठेवले. या ठिकाणी महिलांना आतपर्यंत प्रवेशाचा अधिकार आहे. या प्रकरणी पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)