दिल्लीच्या एम्स रुग्णालयात लालूप्रसाद यांच्यावर होणार उपचार

रांची:  चारा घोटाळा प्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा सुनावलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना सध्या प्रकृती बिघडल्यामुळे रांचीच्या रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र आता त्यांना उपचारांसाठी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत  आहे. चांगले उपचार मिळावेत यासाठी रिम्सच्या वैद्यकीय मंडळाने दिल्लीस्थित एम्स अथवा अन्य मोठ्या रुग्णालयात दाखल करण्याची शिफारस केली होती. त्याला न्यायालयाने परवानगी दिली आहे.
लालूप्रसाद हे उपचारांसाठी आज रांची येथून दिल्लीकडे रवाना होणार आहेत. संध्याकाळी त्यांना राजधानी एक्स्प्रेसने दिल्लीला पाठवण्यात येणार आहे. लालूप्रसाद यांना तीन महिने एम्स अथवा अन्य मोठ्या रुग्णालयात चांगले उपचार देण्याबाबतची सूचना वैद्यकीय मंडळाने केली होती. त्यानंतर सीबीआय न्यायालयाने त्यांना एम्समध्ये उपचारांसाठी दाखल करण्याची परवानगी दिली आहे.
दरम्यान, चारा घोटाळ्यातील चौथ्या प्रकरणात लालूप्रसाद यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने सात-सात वर्षे म्हणजेच एकूण १४ वर्षांचा तुरुंगवास तसेच ६० लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)