दिलेला शब्द पाळण्याची धमक गुदगे यांच्यामध्ये

चंद्रकांत पवार : कलेढोणमधील पवार मळ्यात पाणी योजनेचे भूमिपूजन

मायणी – जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे विविध योजनांचा बारकाईने अभ्यास करणारे व सर्वाधिक विकास निधी खेचून आणणारे जिल्ह्यातील एकमेव नेतृत्त्व आहे. दिलेला शब्द पुर्ण करण्याची धमक त्यांच्यात आहे. त्यांच्या पाठीशी सर्व शक्तीनिशी उभे रहायला हवे, असे आवाहन खटाव पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत पवार यांनी केले.
कलेढोण, ता. खटाव येथील पवार मळ्यात 14 लाख रुपये खर्चाच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या भुमीपुजन कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी मधुकरशेठ पवार, जेष्ठ कार्यकर्ते विठ्ठलआण्णा पाटील, दशरथशेठ पवार, डॉ. खाशाबा पवार, संजयशेठ पवार, अमरशेठ पवार, सुरेशभाऊ पवार, जयभवानी पतसंस्थेचे व्यवस्थापक जनार्दन पवार, अनिलराव दबडे, आदी मान्यवर व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. पवार मळ्यातील पाणी टंचाईच्या समस्या कायमची सुटण्यासाठी तेथे स्वतंत्र नवीन पाणीपुरवठा योजना अस्तित्वात येणे आवश्‍यक असल्याची मागणी ऍड. शरदचंद्र भोसले यांनी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांचेकडे केली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पवार मळ्यातील रहिवाशांनीही सातत्याने पाणी प्रश्‍नी साकडे घातले होते. त्यावेळी गुदगेंनी पाणी योजनेचे काम पूर्ण करुन देण्याचे आश्‍वासन दिले होते. दिलेली आश्‍वासने पाळणारे गुदगे हे एकमेव नेते आहेत. दिलेला शब्द पुर्ण करण्याची धमक त्यांच्यात आहे. जिल्ह्यात अनेक नेते आहेत. पण जिल्हा परिषद सदस्य असतानाही कोट्यावधीं रुपयांचा निधी खेचून आणुन विकास कामे करणारे गुदगे हे एकमेव नेते आहेत. त्यांचा विविध योजनांचा खूप अभ्यास आहे. त्यांची सर्वशक्तीनिशी पाठराखण करावीच लागेल, असे आवाहन पवार यांनी केले. ऍड. भोसले बापूंच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणारी कलेढोणमधील संघटना सुरेंद्र गुदगेंच्या पाठीशी शक्ती उभी करेल. गुदगेंनी कलेढोणसाठी आतापर्यंत कोट्यावधींचा निधी दिला आहे. त्याची योग्य वेळी परतफेड करणे कर्तव्य राहील. अनिल दबडे यांनी प्रास्ताविक केले. जनार्दन पवार यांनी आभार मानले. दरम्यान, पवार मळा येथे मान्यवरांच्या हस्ते पाणी योजनेच्या कामाचे भुमीपुजन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)