दिलीप यादव यांना आदर्श युवा उद्योजक पुरस्कार

कापूरहोळ- करंदी येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त विविध गुणदर्शन कार्यक्रम होत असताना अजिंक्‍य भैरवनाथ मंडळ आणि समाज गुणवंत प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने यंदाचा सन 2017 चा पुणे जिल्ह्यातील आदर्श युवा उद्योजक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. उद्योगक्षेत्रात भरीव व आदर्श काम करून सामाजिक बांधीलकी जपणारे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्‍यातील मोरदरी गावचे दिलीप यादव यांना आदर्श युवा उद्योजक पुरस्कार देण्यात आला. उद्योगव्यवसायातील आव्हाने स्वीकारून, प्रचंड परिश्रम करून ते यशस्वी झाले. त्यांचा आदर्श अनुकरणीय आहे. जल्ह्यातील विशेष करून उत्कृष्ट काम करणाऱ्यांना दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात येत आहे. त्यानुसार गेली 27 वर्ष अजिंक्‍य भैरवनाथ मित्र मंडळ “एक गाव, एक गणपती’ यांस प्रोत्साहन देऊन गुणवंतांना प्रेरणा देत सन्मान करत आहे. यावेळी प्रतिष्ठानचे व मंडळाचे अध्यक्ष योगेश बोरगे, सिद्धेश्वर गायकवाड, दत्तात्रय खाटपे, संदीप बोरगे, आबा कोंढाळकर, सुमित सापते, अमर खाटपे, राहुल बोरगे, संतोष कोलेकर, सुरज बोरगे,सरपंच विष्णू बोरगे, तंटामुक्ती अध्यक्ष मनोज बोरगे, विशाल शिंदे, गणेश गोळे, संपत खाटपे, विठ्ठल खाटपे, रणजीत बोरगे, बाळासो पोटे आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक विठ्ठल पवार यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)