दिलासा सेलचा जिल्हयाचा कारभार अवघ्या 13 कर्मचाऱ्यांवर

नगर – पती पत्नीचे भांडणे, कौटुंबिक वाद विवाद ही बाब संसाराचा गाडा हाकत असतांना पुर्वी पासुन होत आलेली आहे. मात्र पुर्वी याचे पती पत्नीची भांडणे व कौटुंबिक वाद याचे प्रमाण कमी असायचे हल्ली क्षुल्लक कारणावरून पती पत्नीमध्ये दररोज वाद होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. ही भांडणे आता पोलीस स्टेशनपर्यंत येऊ लागली आहेत. ही भांडणे मात्र पोलीस पातळीवरच मिटविण्यासाठी म्हणजेच ती विकोपाला न जाता किंवा पती व पत्नी या दोघांचेही समुपदेशन करून ती मिटविण्यासाठी व संसारिक वाद संपुष्टात आणुन सुखी संसार करून आपसा आपसातील गैरसमज दुर व्हावेत जिल्हयातील कौटुंबिक परिस्थितीत समतोल राहण्यासाठी 15 ऑगस्ट 2017 रोजी पोलीस अधिक्षक कार्यालयाची घरगुती भांडणे मिटविण्यासाठी दिलासा सेल नावाची शाखेची पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या शुभहस्ते सुरूवात करण्यात आली. हि निश्‍चितच जिल्हयाच्या दृष्टीने आंनददायी बाब असली तरी या दिलासा सेलचा जिल्हयाचा कारभार अवघ्या 13 कर्मचाऱ्यांवरच अवलंबुन असल्याची माहितीही समोर आली आहे. ही बाब निश्‍चितच जिल्हयाचा एकंदरीत आवाका पाहता चिंताजनक आहे.
दिलासा सेल मध्ये एक अधिकारी व बाकी 12 कर्मचारी अशी सध्याची स्थिती आहे. येथे जिल्हयातील प्रत्येक तालुक्‍यातून पती पत्नीतील गैरसमज ,वाद विवाद अशी प्रकरणे येत असतात .दररोज सरासरी 4 प्रकरणे येत असतात . यामध्ये पती पत्नीसह दोन्ही कुटूंबियांकडून 5 असे एकूण 10 माणसे एका प्रकरणासाठी म्हणजे दिवसभरात 50 माणसे या कार्यालयात येत असतात त्यातच प्रत्येक प्रकरण मिटवितांना दोन्ही बाजुंचे म्हणने ऐकण्यात साधारणपणे 1 तास एवढा वेळ खर्च होत असतो. बऱ्याच वेळा त्यापेक्षाही जास्त वेळ पती पत्नीचे मने वळवून तक्रार मागे घेण्याकरीता खर्च होतो. या सगळयांना मात्र तोंड देण्यासाठी किंवा प्रत्येक प्रकरणाचा व मागील प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी 13 कर्मचारी हे अत्यंत कमी असल्याची खंत येथील कर्मचाऱ्यांमध्ये दबक्‍या आवाजात नेहमीच बोलली जात आहे. थोडक्‍यात जिल्हयाच्या दृष्टीकोनातुन 13 कर्मचारी ही संख्या निश्‍चितच खुपच कमी असल्यामुळे या शाखेतील प्रत्येक कर्मचाऱ्यावर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याची चर्चाही खाजगीत कर्मचारी बोलतांना दिसत आहेत.निश्‍चितच या अपुऱ्या मनुष्यबळामुळे त्याचा परिणाम प्रकरणांचा निपटारा करण्यातही होत आहे.या कार्यालयात जर कर्मचाऱ्यांची संख्या वाढविली तर दिवसभरात आजच्या पेक्षा बऱ्याच प्रकरणाचा सकारात्मक निपटारा होऊन साहजिकच या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा कामाचा त्रासही कमी होईल .अशी चर्चा दिलासा सेल मधुन कानावर पडत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)