दिलासा नाहीच ! कांद्याची पुन्हा ‘साठी’कडे वाटचाल

किरकोळ बाजारात आवक घटल्याने भावात पुन्हा वाढ


घाऊक बाजारात किलोमागे 4 रुपयांनी वाढ

पुणे- बाजारात हळवी कांद्याची आवक कमी होत आहे. जुन्या कांद्याची नाममात्र आवक होत आहे. परिणामी, कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मार्केट यार्डातील कांदा विभागात कांद्याच्या भावात किलोमागे 4 रुपयांनी वाढ झाली आहे. कांद्यास प्रतिनुसार दहा किलोस 300 ते 370 रुपये भाव मिळत असल्याची माहिती कांद्याचे व्यापारी रितेश पोमण यांनी दिली. किरकोळ बाजारातही कांद्याचे भाव कडाडले असून, कांद्यास प्रति किलोस 40 ते 60 रुपये मोजावे लागत आहेत.

मार्केट यार्डात मागील आठवड्यात दररोज सुमारे दीडशे ट्रक कांद्याची आवक होत होती. त्यामध्ये आता घट झाली आहे. रविवारी 70 ते 75 ट्रक हळवी कांद्याची आवक झली. तर जुन्या कांद्याची 2 ट्रक आवक झाली. बाजारात सध्या नगर जिल्ह्यातून विशेषत: श्रीगोंदा भागातून कांद्याची आवक होत आहे. ही आवक मागणीच्या प्रमाणात खुपच कमी आहे. त्यामुळे शुक्रवारच्या तुलनेत मार्केट यार्डात घाऊक बाजारात कांद्याच्या भावात किलोमागे 4 रुपयांनी वाढ झाली आहे. याविषयी पोमण म्हणाले, सध्या श्रीगोंदा परिसरातून हळवी कांद्याची आवक होत आहे. आणखी 15 दिवस या कांद्याची आवक होईल. गारवी कांद्याचा हंगाम अद्याप सुरू झालेला नाही.

-Ads-

पुढील 15 दिवसांनी हा हंगाम सुरू होईल. या हंगामात पुणे जिल्हा आणि विभागातून कांद्याची आवक होत असते. मागील दोन वर्षात गारवी हंगामातील कांद्याला कमी भाव मिळाला. यावर्षी पाऊसही चांगला आहे. त्यामुळे कांद्याऐवजी इतर नगदी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. त्यामुळे नेहमीच्या तुलनेत गारवीचा हंगामही 50 टक्‍क्‍यांनी कमी होण्याची शक्‍यता आहे. सध्या दक्षिण भारतातूनही कांद्याला मोठी मागणी आहे. त्यामुळे पुढील काही दिवस कांद्याचे भाव चढेच राहण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)