दिया मिर्झाने दीड लाख रुपयात खरेदी केले ‘मदर इंडिया’चे ओरिजनल पोस्टर

1957 साली अभिनेत्री नर्गिस, सुनिल दत्त आणि राजेंद्र कुमार यांची भूमिका असलेला ‘मदर इंडिया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याकाळात या चित्रपटाला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. नुकताच या चित्रपटाच्या ओरिजनल पोस्टरचा लिलाव करण्यात आला. अभिनेत्री दिया मिर्झाने हे पोस्टर तब्बल 1 लाख 45 हजार रुपयांना विकत घेतले आहे.

दियाने ‘मदर इंडिया’चे हे ओरिजनल पोस्टर खरेदी करण्यामागे एक खास कारण आहे. ती हे पोस्टर संजय दत्तला भेट म्हणून देणार असून या पोस्टरचा लिलाव अलिकडेच बॅंकॉक येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय भारतीय फिल्म फेस्टीव्हल (आयफा) पुरस्कार सोहळ्यात पार पडला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘मदर इंडिया’च्या पोस्टरला खूप मागणी होती. मात्र पर्यावरणासाठी काम करणाऱ्या दिया मिर्झाने मोठी बोली लावत बाजी मारली. दरम्यान ‘संजू’ चित्रपटात संजय दत्तच्या पत्नीच्या म्हणजेच मान्यताच्या भूमिकेत दिया मिर्झा झळकणार आहे. “संजू’ रिलीज होण्याच्या दिवशी संजय दत्तला ही संस्मरणीय भेट देण्याचा दियाचा विचार आहे आहे. आयफा पुरस्कार सोहळ्यात पार पडलेल्या या लिलावात अनिल कपूरने ‘मुगल – ए – आजम’ चित्रपटाचे पोस्टर 2 लाख 10 हजार रुपयांना खरेदी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)