दिपोत्सवानिमित्त उद्या वाहतूक व्यवस्थेत बदल

पुणे – शहरातील सारसबाग परिसरात गुरुवार (दि.6) रोजी दिपोत्सव कार्यक्रम होणार आहे. यामुळे परिसरात नागरिकांची मोठी गर्दी होणार असल्याने येथील वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. सकाळी 4 ते गर्दी संपेपर्यत हा बदल राहणार असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

गुरुवारी पहाटे चारपासूनच जेधे चौकाकडून जिजाऊ कॉर्नर समोरुन गणेश कला क्रिडा मंच समोरुन सारसबागेकडे जाणारा रस्ता, पंचमी चौक/ सिटी प्राईडकडून सारसबागेकडे ब्रीजवरुन जाणारा रस्ता बंद राहणार आहे. तसेच, सेव्हन लव्हज मार्गे सारसबागेकडे जाणारा, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स लेन येथून सारसबागेकडे आणि सावरकर चौकाकडून व सारसबागेकडून पुरम चौकाकडे जाणारा मार्ग बंद राहणार आहे. यावेळी नागरिकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करुन देण्यात आला असून त्याचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, सावरकर चौक ते सणस पुतळ्यांपर्यंत गर्दी संपेपर्यंत नो पार्किंग करण्यात आले असून पाटील प्लाझा, पुढारी कार्यालय, मित्रमंडळ कॉलनी परिसर, पेशवे पार्क परिसर आणि सावरकर पुतळा ते पर्वती पायथा ब्रीजपर्यंत सिंगल पार्किंगची सोय करण्यात आली आहे. नागरिकांनी या बदलाची नोंद घेऊन वाहतूक सुरळीत सुरु ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)