दिनकरन यांच्याकडून अण्णाद्रमुकमध्ये आणखी काही फेरबदल

पक्षावर पकड मिळवण्यासाठी हालचाली सुरूच

चेन्नई -तामीळनाडूच्या सत्तारूढ अण्णाद्रमुकवर पकड मिळवण्यासाठी विरोधी गटांमधील हालचाली सुरूच आहेत. आता अण्णाद्रमुकच्या कामकाजापासून दूर ठेवण्यात आलेले उपसरचिटणीस टी.टी.व्ही.दिनकरन यांनी पक्षाच्या आणखी काही पदाधिकाऱ्यांमध्ये फेरबदल केले आहेत.

तामीळनाडूचे मुख्यमंत्री के.पलानीस्वामी आणि माजी मुख्यमंत्री ओ.पन्नीरसेल्वम यांच्या नेतृत्वाखालील अण्णाद्रमुकच्या विरोधी गटांचे अलीकडेच विलिनीकरण झाले. त्यानंतर अण्णाद्रमुकच्या सध्या तुरूंगात असणाऱ्या सरचिटणीस शशिकला आणि दिनकरन यांना पक्षाच्या कामकाजापासून दूर ठेवण्यात येत आहे. त्यामुळे शशिकला आणि दिनकरन समर्थकांनीही आक्रमक पवित्रा स्वीकारत पक्षावर पकड मिळवण्यासाठी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. दिनकरन यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये केलेले फेरबदल या हालचालींचाच भाग मानले जात आहेत.

अण्णाद्रमुकचे 21 आमदार शशिकला आणि दिनकरन समर्थकांच्या गोटात सामील झाले आहेत. त्यामुळे या गटाने पलानीस्वामी यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याची मागणी लावून धरली आहे. पलानीस्वामी सरकारने बहुमत गमावले आहे. असे असतानाही राज्यपाल मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याचा आदेश देण्यास विलंब का लावत आहेत, असा सवाल आज या गटाकडून करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)