दिघी येथील शिबिरात 80 जणांची तपासणी

चिंबळी- महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयतीनिमित्त दिघी येथे डॉ. अनु गायवाड डायबेटीस सेंटरतर्फे मोफत आरोग्य शिबिरात रक्‍त शर्करा, हिमोग्लोबीन, बीएमआय आदि आजारांवरील 80 जणांची मोफत तपासणी केली. यावेळी डॉ. शंकर गायकवाड यांनी मधुमेह, रक्‍तदाब, थॉयरॉईड होण्यामागे चुकीचा आहार व्यायामाचा अभाव व दैनंदिन ताणतणाव हे असल्याचे सांगितले. तरी सगळ्यांनी वेळीच जागरूक होऊन या आरोग्य शिबीराच्या मार्फत मधुमेह तपासणी करून आवश्‍यक उपचार सुरू करणे गरजेचे आहे. मधुमेह पूर्ण आटोक्‍यात ठेवता येतो, असे ही त्यांनी यावेळी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)