दिघीत मित्राकडूनच मित्राचा खून

पिंपरी – डोक्‍यात फरशी घालून मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना गुरुवारी (दि. 1) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी दिघी पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.

प्रदीप शांताराम तळेकर (वय-31, रा. डुडुळगाव) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी शांताराम किसन तळेकर (वय-55) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सिताराम विठोबा वहिले (वय-48, रा. शिवराजनगर, डुडुळगाव) असे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भुजबळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत प्रदीप आणि संशयित आरोपी सीताराम हे दोघे चांगले मित्र होते. गुरुवारी दुपारी तीन वाजता प्रदीप घरातून बाहेर पडले. सायंकाळी सहाच्या सुमारास डुडुळगाव येथे प्रदीप आणि सीताराम दोघे मित्र बसले होते. किरकोळ कारणावरून त्यांच्यात शाब्दिक भांडण सुरु झाले. शिवी दिल्याच्या कारणावरून सीताराम याने शेजारी पडलेली फारशी प्रदीप यांच्या डोक्‍यात घातली. त्यावेळी प्रदीप यांच्या डोक्‍यातून थोडा रक्तस्त्राव झाला. ही भांडणे झाल्यानंतर प्रदीप सहा वाजता घरी आले आणि झोपले. पैसे वाचविण्यासाठी त्यांनी रुग्णालयात जाणे टाळले. दरम्यान त्यांच्या डोक्‍यात अंतर्गत रक्तस्त्राव होऊन डोक्‍यात गंभीर दुखापत झाली. यातच त्यांचा राहत्या घरी मृत्यू झाला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सीताराम याला ताब्यात घेतले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)