दिघीत भर दिवसा घरफोडी

पिंपरी – घराचे लॉक तोडून घरात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 1 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गजानन महाराज मंदिराजवळ दिघी येथे गुरुवारी (दि. 3) सकाळी अकरा ते दुपारी दोनच्या सुमारास घडली.

संतोष भीमराव कुलकर्णी (वय-37, रा. शिवतीर्थ बिल्डिंग, गजानन महाराज मंदिराजवळ, दिघी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष त्यांच्या फ्लॅटला कुलूप लावून कामानिमित्त सकाळी अकरा वाजता बाहेर गेले होते. त्यानंतर अज्ञात चोरट्याने त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेडरूम मधील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 1 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज त्याने चोरून नेला. संतोष दुपारी सव्वादोन वाजता घरी परत आले असता हा प्रकार उघडकीस आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)