दिघीत पीएमपी बस चालकास मारहाण

पिंपरी – अशी बस चालवतात का? असे विचारत एका कारचालकाने “पीएमपीएमएल’च्या बसचालकास शिवीगाळ आणि मारहाण केली. ही घटना रविवारी दुपारी पाचच्या सुमारास पुणे आळंदी मार्गावर घडली.

याप्रकरणी रामचंद्र दशरथ दौड (वय-48 रा. अजिंठानगर, चिंचवड), या पीएमपीएमएल बस चालकाने फिर्याद नोंदविली आहे. एमएच 12 एनएच 4395 क्रमांकाच्या कार चालकाने त्याच्या गाडीला कोणताही धक्का लागला नसताना देखील पुणे-आळंदी रोडवर साई मंदिर बस स्थानकावर बस दोन मिनिट उभी राहिली असता बसच्या पुढे कार केली.

त्यानंतर चालकाने बसमध्ये चढून अशी बस चालवतात का म्हणत बसचालक रामचंद्र याना शिवीगाळ व मारहाण केली. यामध्ये कार चालकाची अद्याप ओळख पटलेली नसून, दिघी पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे व कर्मचा-यास मारहाण करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सोलापूर अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)