दिघीत टोळक्‍याचा धुडगूस

पिंपरी – गाडीला कट मारल्याच्या कारणावरुन झालेल्या वादातून पाच जणांच्या टोळक्‍याने एकाच्या घरावर दगडफेक करुन वाहनाचे व दुकानाचे नुकसान केले. या दगडफेकीत एक महिला जखमी झाली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 23) दिघी येथील गुरुकृपा निवास समर्थनगर येथील पुणेरी हॉटेलमध्ये घडली.

अशोक पवार (वय-50, रा.दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सुबोध उर्फ बंट्या सुहास डोळस (वय-19, रा.पीसीएमसी शाळेजवळ, डोळस वस्ती, दिघी), प्रवीण उर्फ कवट्या अशोक बिरादार (वय-18, रा. हनुमान सुपर मार्केट जवळ, गायकवाडनगर, दिघी), आकाश शिवाजी चव्हाण (वय-18, रा. देवी आई मंदिराजवळ, गायकवाडनगर, दिघी), विकास रामधन पवार (वय-22, रा. राजवीर गॅलक्‍सी कॉलनी नं.2 समर्थनगर, दिघी), निखील संतोष जाधव (वय 18, रा.समर्थनगर, दिघी) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अशोक पावर यांचा मुलगा बालाजी पवार यांचे गुरुवारी (दि.22) आरोपींसोबत गाडीला कट मारल्याच्या कारणावरुन भांडण झाले होते. याचा राग मनात धरुन आरोपींनी पवार कुटूंबियांच्या घरावर शुक्रवारी (दि.23) ला हल्ला करुन दगडफेक केली. यामध्ये अशोक पवार यांच्या पत्नीच्या डोक्‍याला व हाताला दगडाचा मार लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. यानंतर आरोपींनी पवार हे भाड्याने चालवत असलेली टाटा एस या वाहनाची तोडफोड केली. तसेच शेजारीच असलेल्या पुणेरी मिठाईवाले या दुकानाचे शटर उचकटून दुकानाची तोडफोड करुन चार लाखांचे नुकसान केले. पोलिसांनी या पाचही आरोपींना अटक केली आहे. दिघी पोलीस तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)