दिघीतील खून व्याजाच्या वादातून

पिंपरी – दिघी येथील खून प्रकरणाचा गुन्हे शाखा युनिट एकने उलगडा केला असून व्याजाने दिलेल्या पैशातून हा खून झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकऱणी पोलिसांनी एका महिला व रिक्षा चालकाला अटक केली आहे.
सुनंदा जगन्नाथ वाळके (वय-58) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून याप्रकऱणी स्वप्नाली गिरीधारी चौधरी (वय-34, रा. परांडेनगर, चिखली), राधेश्‍याम रामनिवास कोरी (वय-40, रा. भगवाननगर, वडगाव रोड, आळंदी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

सहाय्यक पोलीस आयुक्‍त सतीश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, चऱ्होली बुद्रुक येथे शनिवारी (दि.16) हा खून झाला होता. मयत सुनंदा यांचे चिखली परांडेनगर येथे घर आहे. तिथे आरोपी स्वप्नाली मागील तीन वर्षांपासून भाडेकरू म्हणून राहत होती. स्वप्नालीचे पती सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. स्वप्नाली दामदुपटीचे अमिष दाखवून लोकांकडून पैसे घेत असे. त्यातच तिने सुनंदा यांच्याकडून काही रक्कम वर्षभरात दुप्पट देण्याच्या अटीवर घेतले होते. पैसे घेऊन वर्ष उलटले तरी स्वप्नालीने पैसे परत न दिल्याने सुनंदा यांनी स्वप्नालीकडे वारंवार पैसे मागण्यास सुरुवात केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वारंवारच्या तगाद्याला कंटाळून स्वप्नालीने सुनंदा यांना मारण्याचा कट रचला. गुरुवारी (दि. 14) एकजण पैसे घेऊन येणार असल्याचे सांगून स्वप्नालीने सुनंदा यांना सोबत घेऊन चिखली, मोशी, देहूरोड, तळेगाव, चाकण रोड या भागात फिरवले. मात्र त्या दिवशी सुनंदा यांना मारण्याची संधी साधता आली नाही. पुन्हा शनिवारी तिने राधेश्‍यामच्या सोबतीने त्याच्या रिक्षातून चऱ्होली येथे एका शेतात नेले. जात असताना आरोपीने दुपारच्या जेवणासाठी वडापाव घेतला. सुनंदा वडापाव खात असतानाच स्वप्नालीने सुनंदा यांच्या डोक्‍यात दगड घालून आणि चाकूने वार करून खून केला. दिघी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तपास करत आरोपींना अटक केली.

ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तआर.के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्‍त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्‍तसतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक लावंड, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक काळूराम लांडगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र राठोड, पोलीस कर्मचारी दीपक खरात, राजेंद्र शेटे, प्रमोद लांडे, प्रमोद वेताळ, सचिन उगले, अमित गायकवाड, महेंद्र तातळे, सावन राठोड, गणेश सावंत, प्रवीण पाटील, प्रमोद हिरळकर, सुनील चौधरी, गणेश मालुसरे, तानाजी पानसरे, अरुण गर्जे यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)