दिग्दर्शक स्कॉट बियोवर लैंगिक अत्याचाराचा आरोप

मुंबई : ‘बेवॉच’ ची अभिनेत्री निकोल इगर्टने अभिनेता आणि दिग्दर्शक स्कॉट बियोवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. निकोलने सांगितले की, ही घटना घडली तेव्हा मी अल्पवयीन होते. पण हे सर्व आरोप स्कॉटने फेटाळले आहेत. निकोलने स्कॉटसोबत व्यंग्य आधारित शो चार्ल्स इन चार्जमध्ये काम केले आहे. 1984 ते 1990 या काळाच हा शो प्रसारित होत असे. या दोन्ही कलाकारांनी 1980 मध्ये एकमेकांना डेट देखील केले होते.
एसेशोबिज डॉट कॉमच्या माहितीनुसार, 46 वर्षीय निकोलने हा आरोप लावला आहे. आयएएनएसने दिलेल्या माहितीनुसार एका ट्विर युझरला सांगितले की, स्कॉटला विचारा की जेव्हा तो नाबालिक होता तेव्हा स्कॉटच्या घरातील गॅरेजमध्ये नेमकं काय झालं. त्यानंतर त्यांनी स्वतः सांगितले की, आपण देखील लैंगिक अत्याचाराचे बळी आहेत. तेव्हा त्यांचं वय 14 ते 17 वर्षाच्या आतच होते.
लॉरेंसने गेल्यावर्षी एका कार्यक्रमात आपली गोष्ट मांडली. त्यांनी सांगितले की, एका प्रोड्युसरने तिच्यासोबत दुर्व्यवहार देखील केला होता. कपड्यांशिवाय उभे राहण्यास तिला सांगितले. तिचा हा अनुभव हा अतिशय लाजिरवाणा आणि दुःखद आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)