दिगवेकरने केली रेकी, तर बंगेराने मारेकऱ्यांना दिले प्रशिक्षण

सीबीआयचा दावा : दोघांना 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी


सचिन अंदुरेची रवानगी न्यायालयीन कोठडीत

पुणे – सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांना पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण राजेश बंगेरानेच दिल्याचा दावा सीबीआयने न्यायालयात केला आहे. तर, अमित दिगवेकर मागील 15 वर्षापासून गोवा आश्रमात राहत होता. त्यावेळी तो डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या संपर्कात असल्याचे सीबीआयने म्हटले आहे. त्या दोघांना 10 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. भळगट यांनी दिला आहे. तर सचिन अंदुरे याची यावेळी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

पोलीस कोठडीची मुदत संपल्याने सीबीआयने अंदुरे आणि बंगेरा आणि दिगवेकर या दोघांना अटक करून शनिवारी न्यायालयात हजर केले. त्यावेळी पोलीस सीबीआयचे विशेष सरकारी वकील विजयकुमार ढाकणे यांनी युक्तीवाद करत पोलीस कोठडीची मागणी केली. ते म्हणाले, “राजेश बंगेरा कर्नाटक येथील शासकीय कर्मचारी असून शिक्षण खात्यात कार्यरत होता. तसेच तेथील आमदाराचा तो स्वीय सहायक म्हणूनही कार्यरत होता. बंगेरा हा गौरी लंकेश यांच्या हत्येतील आरोपी असून अंदुरेच्या पोलीस कोठडीत केलेल्या तपासामध्ये त्यानेच डॉ. दाभोलकर यांच्या हत्येतील शुटर शरद कळसकर आणि सचिन अंदुरेला पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण दिल्याचे समोर आले आहे. त्याचा हत्येच्या कटात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. बंगेराने त्या दोघांना राज्यात आणि कर्नाटकात कोठे पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण दिले. याचा तपास करायचा आहे. प्रशिक्षणासाठी शस्त्रसाठा कोणी पुरविला याचाही तपास करायचा आहे. त्याने प्रशिक्षण देण्याबरोबरच हत्येच्या कटातील एक आरोपी असून त्याने डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्याबरोबर हा कट केल्याचे सीबीआयच्या तपासात निष्पन्न झाले आहे. तर, अमित दिगवेकरच्या हा हिंदू जनजागृती संघाचा कार्यकर्ता आहे. तो आणि सीबीआयला ताबा हवा असलेला आरोपी अमोल काळे हे दोघे जवळून डॉ. तावडेच्या संपर्कात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दिगवेकर हा गौरी लंकेश हत्येतील एक आरोपी असून सचिन अंदुरेच्या तपासामध्ये त्याने डॉ. दाभोलकर यांची हत्याकरण्यासाठी रेकी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दिगवेकर हा देखील कटातील एक आरोपी असून त्याने गुन्ह्याचा कट कसा केला याचा तपास करायचा आहे.’

 

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)