अवसरी -संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळयाचा व कार्तिकी वारी निमित्ताने आयोजित श्रीक्षेत्र गल्ले बोरगाव (जि. औरंगाबाद) ते श्री क्षेत्र आळंदी हभप बाळकृष्णमहाराज दारकोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या पायी दिंडी सोहळ्याचे स्वागत अवसरी खुर्द येथे सामाजिक कार्यकर्ते रामदास भिकाजी टेमकर व विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक लक्ष्मण यांनी पुष्पहार घालून करण्यात आले.
या प्रसंगी सायंकाळी टेमकर यांच्या निवासस्थानी हभप सिद्धेश्वरमहाराज पाटील यांचे कीर्तन झाले. त्यानंतर धार्मिक कार्यक्रम भजन झाल्यावर उपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. यावेळी पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. दुसऱ्या दिवशी पहाटे काकडा भजन झाल्यानंतर सात वाजता बाळासाहेब टेमकर यांच्या येथे सकाळी नाष्टा झाला. माजी सरपंच शामराव टेमकर यांच्या येथेही दिंडी सोहळ्याला चहा पाणी झाला. त्यानंतर दुपारी बबन जिजाबा टेमकर यांच्या येथे दुपारचे भोजन करून दिंडी सोहळ्याचे आळंदीकडे प्रस्थान झाले. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन अविनाश टेमकर, रविंद्र टेमकर, सुरेश गजानन टेमकर, दिनेश टेमकर, सुरज टेमकर, अतुल टेमकर, प्रविण टेमकर, प्रमोद टेमकर, दिलीप टेमकर, निलेश टेमकर आदिंनी केले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा