दावा दाखल केल्यानंतर सहा महिन्यांतच निकाली – मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपये नुकसानभरपाई

पुणे – अपघातात मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपये नुकसानभरपाई मिळणार आहे. दावा दाखल केल्यापासून सहा महिन्याच्या आत निकाली निघाला आहे. शनिवारी झालेल्या लोकअदालतमध्ये जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एम.एम. मेनजोगे यांच्या पॅनेलने हा दावा निकाली काढण्यात आला. प्रमिला अशोक जगताप (वय 55, रा. वानवडी), असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचे पती अशोक यांनी 5 लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी, यासाठी येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे ऍड. अनिल पटनी आणि ऍड. अशिष पटनी यांच्यामार्फत दावा दाखल केला होता. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात हा दावा दाखल करण्यात आला होता. दि. 9 मार्च 2018 रोजी प्रमिला आणि त्यांचे पती अशोक कात्रज – कोंढवा रस्त्यावरून दुचाकीवरून निघाले होते. अशोक गाडी चालवत होते. तर प्रमिला पाठीमागे बसल्या होत्या. त्यावेळी पाठीमागून आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यावेळी झालेल्या अपघातात प्रमिला यांचा मृत्यू झाला. या पार्शभूमीवर एप्रिल 2018 मध्ये 5 लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी, यासाठी अशोक यांनी ऍड. अनिल पटनी आणि ऍड. आशिष पटनी यांच्यामार्फत दावा दाखल केला होता. शनिवारी झालेल्या महालोकअदालतमध्ये तडजोडीअंती 4 लाख रुपये नुकसानभरपाई देत दावा निकाली काढण्यात आला. विमा कंपनीच्या वतीने ऍड. जयश्री वाघचौरे यांनी काम पाहिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)