दाऱ्या घाटाचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील – रावल

जुन्नर -दाऱ्या घाटाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे, असे राज्याचे पर्यटन व रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
जुन्नर तालुका विशेष पर्यटन तालुका म्हणून घोषित करून अधिकृत अध्यादेश काढल्याबद्दल मंत्री जयकुमार रावल यांचा विधानभवन मुंबई येथे जुन्नर शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळभ स्तकाराला उत्तर देताना ते बोलत होते. शहराध्यक्ष नरेंद्र तांबोळी यांच्या हस्ते रावल यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल मेहेर, अनुसूचित जाती मोर्चाचे उपजिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळवे, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मनीषा पारेकर, अल्पसंख्याक महिला अध्यक्ष नूरजहॉं शेख, महिला शहर अध्यक्ष श्वेता गोसावी, सविता गोडे, अशोक भोजणे, सादिक शेख, रफिक तकी, गणेश बुट्टे पाटील, दत्ता वाकचौरे, बाळासाहेब दुबे, निलेश गायकवाड, रामदास साळवे, युसूफ शेख, रोहित परदेशी, आशिष पांडव, कैलास सांगडे, दाजी लांडे, संदीप सुपे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. जुन्नर तालुका पर्यटन तालुका जाहीर करण्यासाठी शासनस्तरावर पालकमंत्री गिरीश बापट, जिल्हाध्यक्ष बाळाभाऊ भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करण्यात आले असल्याचे शहराध्यक्ष नरेंद्र तांबोळी यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)