दार्जीलिंग आंदोलन-गुरखा नेत्यांची ममता बॅनर्जींशी चर्चा

कोलकाता (पश्‍चिम बंगाल) -स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी चालू असलेल्या बेमुदत दार्जीलिंग बंदचा आज 77 वा दिवस.दार्जीलिंगमधील काही आंदोलनकर्ते नेते आज आज पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत. त्यामुळे या पेचप्रसंगातून काही मार्ग निघण्याची शक्‍यता निर्माण झालेली आहे.

मात्र पश्‍चिम बंगालची विभागणी होणार नाही, असे ममता बॅनर्जी यांनी अगोदरच स्पष्ट केलेले आहे. इकडे आंदोलनाचे नेतृत्व करणारा जीएनएम (गुरखा जनमुक्ती मोर्चा) प्रमुख बिमल गुरुंग चर्चेत सहभागी होणार नाही. त्याचा सहकारी बिनय तमंग पाच सदस्यांच्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करणार आहे. यातून काहीतरी मार्ग निघेल अशी अपेक्षा असल्याचे बिनय तमंग यांनी सांगितले आहे.

जीएनएलएफ (गुरखा नॅशनल लिबरेशन फ्रंट), जेएपी (जन आंदोलन पार्टी), एबीजीएल(अखिल भारतीय गुरखा लीग) हे पक्षही चर्चेत सहभागी होणार आहेत. संघर्षग्रस्त दार्जीलिंगमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी या हेतूने जीएनीलएफने ममता बॅनर्जींना चर्चेची विनंती केली होती. पश्‍चिम बंगालचे विभाजन होणार नाही, दार्जीलिंग हा त्याचा अविभाज्य हिस्सा आहे. हे स्पष्ट करूनच ममता बॅनर्जींनी चर्चेस तयारी दर्शविली आहे.

ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चेपूर्वीच जीजेएममध्ये फूट पडल्याची बातमी आहे. जीजऐममधील काही नेत्यांनी आपल्याविरुद्ध कट चालविला असून त्यांची नावे लवकरच प्रसिद्ध करू. आणि गुरखालॅंड शिवाय कोणत्याही विषयावर चर्चा केली, तर या नेत्यांना पुन्ही दार्जीलिंगमध्ये प्रवेश करू दिला जाणार नाही, असे गुरुंग याने एका ध्वनिसंदेशात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)