दार्जिलिंगच्या तणावपूर्ण वातावरणातील निरागसता…

दार्जिलिंग : एकीकडे दार्जिलिंगमध्ये स्वतंत्र गोरखालॅंडसाठी आंदोलने होत आहेत. या आंदोलनाला हिंसक वळणदेखील मिळाले आहे. शेकडो वाहनांची जाळपोळ होत आहे तर याच हिंसेत एकाचा मृत्यूदेखील झाला. स्वतंत्र गोरखालॅंडच्या मागणीवर आंदोलक अडून बसले आहेत त्यामुळे इथली परिस्थिती पुर्णपणे तणावपुर्ण असून कर्फ्युची परिस्थिती सध्या दार्जिलिंगमध्ये आहे. दरम्यान, यासर्व तणावपूर्ण वातावरणाशी काही देणे-घेणे नसल्याचे एक बोलके छायाचित्र समोर आले आहे. एका चिमुरड्याला या वातावरणातही खेळण्याचा मोह आवरता आला नाही. तर दुसरीकडे या चिमुरड्याला अडवण्याचेही प्रयत्न इथे तैनात असलेल्या लष्कराने केले नाही असेच दिसत आहे. दरम्यान, आंदोलकांनी आपली मागणी आजही लावून धरली असल्याचे सांगण्यात येत आहे.
(फोटो सौजन्य पीटीआय)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)