दारू प्याल, तर नोकरी गमवाल

पालिका वाहन विभाग : पीएमपी डेपोतही होणार तपासणी

पुणे – महापालिकेच्या वाहनांचे चालक तसेच पीएमपी चालकांची या पुढे नियमित “ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह’ तपासणी केली जाणार आहे. त्या अंतर्गत पालिकेच्या वाहन डेपोंसह पीएमपीच्या सर्व डेपोंवर “ब्रेथ अॅनलायझर’ उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेकडे सुमारे 900 वाहने आहेत. ती कचरा वाहतूक, पाणीपुरवठा, ड्रेनेज विभाग तसेच इतर विभागांसाठी आहेत. अनेकदा एखादी दुर्घटना घडल्यानंतर पालिकेच्या चालकाने मद्यपान केल्याचे समोर येते. त्यामुळे यापुढे ज्या विभागाकडे पालिकेची वाहने आहेत, त्या विभागासाठी वाहतूक नियोजन विभाग “ब्रेथ अॅनलायझर’ देणार आहे. या मशीनद्वारे कर्मचाऱ्यांची कामावर जाण्यापूर्वी तसेच काम संपताना तपासणी केली जाईल, अशा पद्धतीने नियोजन केले जाणार आहे. तसेच एखाद्या कर्मचाऱ्यांकडून वारंवार “ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह’ केले जात असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कारवाईही केली जाणार आहे, असे महापौरांनी स्पष्ट केले.

पीएमपी डेपोतही यंत्रणा
गेल्या काही वर्षांत पीएमपीच्या अनेक अपघातानंतर चालकाने मद्यप्राशन केल्याचे आढळून आले आहे. अशा चालकांवर पोलीस कारवाई करत असले, तरी हे प्रकार होऊच नयेत तसेच चालकांच्या चुकीच्या वागणुकीमुळे कोणत्याही नागरिकाच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, यासाठी पीएमपीच्या सर्व डेपोंना या मशीन दिल्या जाणार आहेत. त्यानुसार, चालक कामावर जाण्यापूर्वी तसेच काम संपल्यानंतर त्यांची “ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह’ची तपासणी केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)