दारू पिताना झालेल्या वादतून गुन्हेगाराचा खून

हडपसर : दारू पीत असताना पैशांच्या कारणावरून झालेल्या वादतून एकाला दगडाने मारहाण करत खून करण्यात आला. ही घटना रामटेकडी रेल्वे रुळालगत किर्लोस्कर पुलाखाली घडली. याप्रकरणी चार आरोपींना गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी अटक केली आहे.

सनी विकास बगाडे असे खून झालेल्याचे नाव असून तो सराईत गुन्हेगार आहे. याप्रकरणी जीवन खंडागळे, अजय लकीपो, लखन बनसोडे, जमीर उर्फ गुड्डू शेख (सर्व रा. रामटेकडी, हडपसर) यांना अटक केली आहे. आरोपी व मयत हे मित्र आहेत. ते रविवारी (ता.28) उड्डाणपूलाखाली दारू पीत बसलेले असताना सनीने गुडू शेख याला दहा रुपये मागितले. गुडूने पैसे देण्यास नकार देताच सनीने शिवीगाळ केली.

मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या अजय याच्याशी वाद घातला. लखन बनसोडे याने वाद मिटविण्याचा प्रयत्न केला असता लखन बनसोडे याला सनी याने दगडाने मारहाण केली. व तोंडावर ठोसा मारला. जखमी लखन याला पाहून त्याच्या इतर साथीदारांनी सनी याला लोखंडी रॉड व दगडाने जबर मारहाण केली. या मारहाणीत सनी बगाडे ठार झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)