दारू पिण्यास पैसे न दिल्याने मित्राची दुचाकी पेटवली

वाकी, – मुटकेवाडी (ता. खेड) येथे दारू पिण्यास पैसे दिले नाही, या कारणावरून चिडलेल्या एकाने मित्राचीच दुचाकी पेटविल्याप्रकरणी आज (गुरुवारी) सायंकाळी सहाच्या सुमारास एकाच्या मुसक्‍या आवळल्या असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव व पोलीस हवालदार नामदेव जाधव यांनी दिली. राहुल बाबासाहेब सातव (रा. मुटकेवाडी, ता. खेड) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर विकास रामनाथ शिंदे (वय 27 वर्षे, रा. मुटकेवाडी, चाकण, मूळ रा. सुक्रेवाडी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. येथील पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राहुल व विकास हे एकमेकांच्या ओळखीचे असून, ते दोघे मित्र आहेत. राहुल याने बुधवारी (दि. 28) दुपारी तीनच्या सुमारास विकासकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र, विकासने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे राहुलने विकासच्या मोटार सायकलची (एमएच 17 सीए 6647) पेट्रोलची नळी काढली व आगपेटीद्वरे आग लावून दुचाकी जाळली. पार्किंगमध्ये असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले असता खरा प्रकार उघडकीस आला. चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)