दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने ब्लेडने वार

पिंपरी- दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणाला मारहाण करून त्याच्या गालावर ब्लेडने वार करण्यात आले. ही घटना शनिवारी (दि. 3) रात्री साडेअकराच्या सुमारास निगडी येथील ओटास्किम परिसरात घडली.

या प्रकरणी रवींद्र नाटेकर (21, रा. ओटास्किम, निगडी ) हा तरुण या हल्ल्‌यात जखमी झाला आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार राहुल (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही ) आणि योगेश साळवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रवींद्र आणि त्यांचा मित्र गणेश उदयकार दुचाकीवर जात असताना त्यांच्या तोंड ओळखीचे राहुल आणि योगेश यांनी त्यांना अडवले. आरोपींनी त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली. रवींद्र यांनी पैसे देण्यास न आकार दिल्याने आरोपींनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपी राहुल याने चिडून रवींद्र यांच्या गालावर वार केले. निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक होळकर करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)