दारू पिऊन कार चालवणाऱ्याला तीन वर्षे शिक्षा

कोरेगाव तालुक्‍यातील घटना; दोघे जखमी तर एकाचा मत्यू झाला होता

सातारा,दि.11(प्रतिनिधी) – दारू पिऊन बेदारकपणे कार चालवत दोघांना जखमी करून एकाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या एकाला तीन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. भुषण अतुल कदम (रा. खेड नांदगिरी ता. कोरेगाव) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत मिळालेली माहिती अशी की, दि.6 नोव्हेंबर 2017 रोजी यातील आरोपीकडून सातारारोड गावच्या हद्दीत दारूच्या नशेत अपघात झाला होता. सातारारोड गावात रस्त्याकडेला बोलत उभे असलेले सुरेश दशरथ घनवट, आकोबा बाबा सुळ, हरीचंद्र भिवाजी काशिद (सर्व रा. नांदगिरी,ता.कोरेगाव) यांना भुषण कदम याने त्याच्याकडील कार क्रं एमएच12 सीके 8986 या कारने दारूच्या नशेत जोराची धडक दिली होती.

या धडकेत सुरेश दशरथ घनवट, आकोबा बाबा सुळ हे दोघे गंभीर जखमी झाले होते.घनवट यांच्या छातीला तर सुळ यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. तर जखमी हरीचंद्र भिवाजी काशिद यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्याचे हवालदार सत्यवान बसवंत यांनी फिर्याद दिली होती. या खटल्याची सुनावणी साताऱ्यातील चौथे प्रथमवर्ग न्यायाधीश वर्षा पारगावकर यांच्या न्यायालयात सुरू होती.

सुनावणी दरम्यान सरकारी वकील उर्मिला फडतरे, कुलकर्णी यांनी तपासलेले साक्षीदार व केलेला युक्तीवाद ग्राह्य मानत आरोपीला तीन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.आरोपीने पाच हजार दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने ठोठावली. याकामी पोलिस प्रॉसिक्‍यूशनचे फौजदार उदय कबुले,हवालदार सुनिल सावंत, अनिल शिंदे, धनंजय दळवी, कांचन बेंद्रे यांनी काम पाहिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)