दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा

पिंपरी – भाटनगर येथे पोलिसांनी अवैध दारू साठ्यावर छापा मारत 47 लिटर दारू, 1 हजार 500 लिटर दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी रसायने असा एकूण 23 हजार 910 रुपयांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (दि. 28) दुपारी पाचच्या सुमारास करण्यात आली आहे.

भाटनगर येथील एका वसाहतीमध्ये छापा मारला. त्यावेळी प्लास्टिकच्या बॅलरमध्ये दारू भरून ठेवल्या होत्या. तसेच लहान पिंपांमध्ये भट्टी लावल्याचेही आढळले. त्यावरून आढळून आलेल्या संपूर्ण दारूची विल्हेवाट लावून संबंधितांवर मुंबई दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीमधील भाटनगर येथे काही घरांमध्ये दारू भट्ट्या लावण्यात येत असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार भाटनगर येथील एका वसाहतीमध्ये छापा मारला. त्यावेळी प्लास्टिकच्या बॅलरमध्ये दारू भरून ठेवल्याचे आढळून आले. तसेच लहान पिंपांमध्ये भट्टी लावल्याचेही आढळले. त्यावरून आढळून आलेल्या संपूर्ण दारूची विल्हेवाट लावून संबंधितांवर मुंबई दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)