दारूबंदीसाठी महिलांची पोलीस ठाण्यात धडक

शिक्रापूर -निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथे अनेक दिवसांपासून गावठी दारुनिर्मिती केली जात असून ग्रामस्थांना त्याचा त्रास होत आहे. मागील आठवड्यात दारू व्यावसायिकांनी शेतकऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले; तरीदेखील तेथे गावठी दारू बनविण्याचे प्रकार सुरु असल्याने आज येथील संजीवनी महिला बचत गटाच्या महिलांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यावर आपला मोर्चा वळवून गावठी दारूभट्ट्या बंद करण्याची मागणी केली आहे.

निमगाव म्हाळुंगी येथे 23 मार्च रोजी शिवाजी भागवत यांना येथील गावठी दारू बनविणारे अमोल शिवाजी चौघुले व चंद्रकांत शिवाजी चौघुले यांनी भागवत यांनी त्यांच्या शेतामध्ये दारू लपवू नका, असे म्हटल्याने मारहाण करत धमकी दिल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे; परंतु आजही सर्रास दारू बनविण्याचे प्रकार होत असल्याने आज बचत गटाच्या महिलांनी शिक्रापूर पोलीस ठाणे गाठले व निवेदन देत दारू बंद करण्याची मागणी केली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत माने, सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल कोळेकर यांना बचत गटाच्या वतीने निवेदन देण्यात आले. याप्रसंगी संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रोहिणी भागवत, सचिव मयुरी भागवत, मंगल भागवत, उर्मिला गवते, पूनम भागवत, सविता तागड, रुपाली भागवत, करिष्मा भागवत, जयश्री भागवत, शारदा पवार, ज्योती गवते, ठकुबाई भागवत, अश्विनी भागवत, लता भागवत, संगिता भागवत, अलका तागड यांसह आदी महिला उपस्थित होत्या.

यावेळी महिलांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या, तर यावेळी महिलांनी दिलेल्या निवेदनात गावठी दारू बनविणारे रस्त्याने येता-जाता वेगाने वाहने चालवितात. त्यामुळे अपघात होऊ शकतो तसेच येथे गावठी दारू बनविण्याचे रसायन ओढे व विहिरींच्या पाण्यामध्ये उतरत असून ओढ्याचे व विहिरींचे पाणी दूषित होत असल्याचे म्हटले आहे. येथील गावठी दारू बनविणाऱ्या लोकांवर कारवाई करून दारूभट्ट्या बंद करण्याची मागणी संतप्त महिलांनी व्यक्त केली. पोलिसांनी कारवाई करून या दारू भट्ट्या बंद केल्या नाहीत तर महिलांच्या वतीने वेगळे पाऊल उचलणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)