दारूबंदीसाठी प्रशासनाकडून कार्यक्रम निश्‍चित

शिरूर -शिरुर तालुक्‍यात दारूबंदी करण्यासाठी प्रशासनाकडून कार्यक्रम निश्‍चित केला असून दोन मार्चपर्यंत अवैध आणि अनियमित दारूबंदीचे आश्वासन देऊन केंदूर आणि मांडवगण फराटा येथे शंभर टक्‍के दारूबंदी करणार आहे, अशी ग्वाही राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक मंगेश कावळे, दोन्ही पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांनी दिले. तसेच यापुढे तालुक्‍यात पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी यांनी गावातील अवैध दारूची माहिती देणार असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले आहे. त्यानुसार ताबडतोब कारवाई करणार आहे. त्यामुळे 2 मेपर्यंत क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी सुरू केलेले सविनय कायदेभंग आंदोलन स्थगित केले आहे.

शिरूर तालुका दारूबंदी आंदोलनाबाबत सोमवारी (दि.26) सायंकाळी पाच ते आठ या वेळेत तहसीलदार कार्यालयात तहसीलदार रणजित भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंगेश कावळे आदी उपस्थित होते.

या बैठकमध्ये झालेले निर्णय पुढीलप्रमाणे : शिरुर तालुक्‍यातील केंदूर आणि मांडवगण फराटा येथील महिलांनी मतदान करुन “उभी बाटली,आडवी केली. तेथे शंभर टक्के दारूबंदीची राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस स्टेशन अंमलबजावणी करणार आहे. त्यासाठी तीन ते चार दिवसांत ग्रामस्थांनसमवेत बैठक घेणार आहे. आठवड्यात अंमलबजावणी करणार.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)