दारूच्या नशेत शिवीगाळ करणाऱ्याला कारावासाची शिक्षा

लोणी काळभोर – कुसगाव बुद्रुक (मावळ) येथे दारूच्या नशेत हत्यार घेऊन हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथे शिवीगाळ करीत तोडफोड करणाऱ्या सुरेश गणपत गोणते या आरोपीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, वडगाव यांनी नुकतीच 11 महिने कारावासाची शिक्षा सुनावली. 20 नोव्हेंबर 2016 रोजी कुसगाव बुद्रुक (मावळ) येथे असलेल्या पद्मावती हॉस्पिटलमध्ये सुरेश गणपत गोणते (वय 45, रा. ओळकाईवाडी कुसगाव बुद्रुक, ता. मावळ) याने दारू पिऊन हातात कुऱ्हाड घेऊन प्रवेश केला आणि तिथे डॉ. सीमा शिंदे यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली. त्यांनी नकार दिल्याने शिवीगाळ करीत गोणते याने हातातील कुऱ्हाडीने हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली. याप्रकरणी डॉ.सीमा शिंदे यांनी लोणावळा ग्रामीण पोलिसांमध्ये फिर्याद नोंदविली होती. त्यानुसार गोणते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, वडगाव मावळ यांनी गोणते याला 11 महिने सश्रम कारावास व 100 रुपये दंड अशी शिक्षा दिलेली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)