पुणे – दारूच्या नशेत भरधाव दुचाकी चालवत झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना 2 ऑगस्ट 2016 रोजी घडली होती. याप्रकरणी तपासाअंती संतोष नरसिंग राठोड (35,रा.बिबवेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक अशोक माने(28,रा.अंबिकानगर, बिबवेवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
आरोपी संतोष राठोड व विनायक माने दोघेही एकमेकांचे मित्र होते. घटनेच्या दिवशी राठोड हा दारुच्या नशेत दुचाकी चालवत होता. तर माने हा त्याच्या पाठीमागे बसला होता. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीला अपघात झाला होता. यामध्ये गंभीर जखमी होऊन माने याचा मृत्यू झाला. याप्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक एस. एल. चौधरी तपास करत आहेत.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा