दारूची अवैध वाहतूक करणारे जेरबंद

पो.नि.सारंगकर यांची कारवाई ; पाच हजाराच्या दारूसह आठ लाखाच्या गाड्या जप्त

सातारा,दि.24(प्रतिनिधी) – दारू वाहतूकीचा परवाना नसताना तीची वाहतूक करणऱ्या दोघांना पोलिसांनी मुद्देमालासह जेरबंद केले. ही कारवाई सातारा शहर पोलिस ठाण्याचे पो.नि.नारायण सारंगकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. यावेळी पोलिसांनी पाच हजार किमंतीची विदेशी दारू व आठ लाखाच्या दोन कार जप्त केल्या.
शुक्रवारी मध्यरात्री पो.नि. सारंगकर व त्यांचे सहकारी बॉम्बे रेस्टॅरंट परिसरात नाका बंदी करत होते. त्यानंतर मध्यरात्री दीडच्या सुमारास सारंगकर व सहकारी महामार्गाच्या सर्व्हीस रोडने वाढे फाट्याकडे निघाले होते. त्यावेळी चाहूर गावच्या हद्दीत एक ट्रॅव्हल्स थांबली होती. पोलिसांनी त्यांची गाडी बाजुला थांबवली व त्या गाडीवर पाळत ठेवली. त्यावेळी थांबलेल्या ट्रॅव्हल्सच्या चालकाने ट्रॅव्हल्समधुन पांढऱ्या रंगाचे पोत्यात असलेली दारू संशयीत आरोपी देवानंद शिंदे,संतोष मुसके यांच्याकडे दिली. त्यावेळी पोलिसांनी या दोघांना हटकेले तेव्हा त्यांनी पळुन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून विदेशी दारूच्या चोवीस बाटल्या व अल्टो कार (एमएच 11 बीव्ही 3212) मान्झा कार (एमएच 11 ए डब्ल्यू 6849) या कारसह पकडले. त्यांच्याकडून एकूण आठ लाख पाच हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही दारू नेमकी कुठे विकली जाणार होती. कुठुन आणली याचा तपास पो.हवालदार दत्ता पवार करत आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)