दारु पिण्यास पैसे दिले नाही म्हणून दुचाकी पेटवली

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील जारकरवाडी येथे आई-वडिलांनी दारु पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे मुलाने नवीन घेतलेली दुचाकी मोटार सायकल आणि घराच्या दरवाजावर रॉकेल टाकुन पेटवुन दिल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये 85 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना गुरुवारी (दि. 1) सायंकाळी घडली.
याप्रकरणी मुलगा अशोक भोजणे (वय 28) यांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात त्याचे वडील बाळु भोजणे यांनी फिर्याद दिली आहे. जारकरवाडी गावाच्या हद्दीतील बिरोबामळा येथे बाळु भोजणे आणि त्यांची पत्नी ताराबाई राहतात. तेथे त्यांचा मुलगा अशोक भोजणे हा दारू पिऊन आला होता आणि त्याने आणखी दारु पिण्यास पैसे मागितले; परंतु त्याला पैसे दिले नाही म्हणून अशोक याने आई-वडिलांना शिवीगाळ करुन लाथाबुक्‍यांनी मारहाण केली. तसेच घरासमोर असलेली नवीन होंडा कंपनीची ग्लॅमर मोटार सायकल पेटवुन दिली. यामध्ये 85 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच माझ्या विरोधात पोलिसात तक्रार दिली तर मी जेल मधुन आल्यावर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी आपल्या आई-वडिलांना दिली. या घटनेचा तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी ए. व्ही. भोसले करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
2 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)