दारुसाठी डोक्‍यात घातला दगड

पिंपरी – दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने एकाच्या डोक्‍यात दगड घातल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि. 11) सायंकाळी पाचच्या सुमारास काळेवाडी फाटा येथील स्टेट बॅंकेसमोर घडली.

अनिल भीमराव नाईकवाडे (वय-49, रा. जयमल्हार कॉलनी, थेरगाव) असे यामध्ये जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे. सोमनाथ घोगरे (रा. गुरुनानकनगर, साने गुरुजी शाळे मागे, थेरगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास काळेवाडी फाटा येथील स्टेट बॅंकेसमोरुन अनिल नाईकवाडे पायी चालले होते. यावेळी सोमनाथ त्यांच्याजवळ आला आणि दारु पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र नाईकवाडे यांनी पैसे देण्यास नकार दिला. यामुळे चिडलेल्या घोगरे याने रस्त्यावरील दगड नाईकवाडे यांना फेकून मारला. तो दगड नाईकवाडे यांच्या कानावर लागला आणि ते गंभीर जखमी झाले. वाकड पोलीस तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)