दाम्पत्याची 33 लाखांची फसवणूक

तळेगाव – सोन्याची बिस्कीटे मिळवून देतो म्हणून एका दाम्पत्याची 33 लाख रुपयांची फसवणूक केली. हे पैसे मागण्यासाठी गेले असता दाम्पत्याला मारहाण करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (दि. 16) दुपारी सव्वा तीन वाजता घडली.

याप्रकरणी सोनाली जहागीर बिस्वाल (वय-24, रा.नारायण गाव, ता. जुन्नर) यांनी फिर्याद दिली असून प्रकाश सावळे व त्याच्या इतर पाच साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आठ महिन्यांपूर्वी आरोपींशी ओळख झाली. त्यावेळी त्याने कमी किंमतीत सोन्याचे बिस्कीटे मिळवून देतो म्हणून वेळोवेळी असे 33 लाख रुपये घेतले. मात्र अद्यापपर्यंत दिले नाहीत. त्यामुळे बिस्वाल दाम्पत्य पैसे मागण्यासाठी गेले असता आरोपीने त्यांना मी या गावचा दादा आहे. तु माझे काही बिघडवू शकणार नाही. यांना संपवून टाका अशी धमकी देत. त्यांना गाडीत घेऊन जाऊन त्यांना धक्काबुक्की केली व सोनाली यांचाशीही गैरवर्तणूक केली. तळेगाव पोलीस ठाण्यात प्रकाश व त्याच्या साथीदारा विरोधात मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)