दाभोलकर प्रकरण : अमोल काळेची रवानगी न्यायालयीन कोठडीत

सीबीआय कोठडीत एसआयटीने मारहाण केल्याची बचाव पक्षाकडून तक्रार

पुणे – अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी अमोल काळे याला सीबीआय कोठडीत असताना एसआयटीकडून मारहाण झाल्याची तक्रार बचाव पक्षाकडून शुक्रवारी न्यायालयात करण्यात आली. दरम्यान, त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. एस. ए. सय्यद यांनी दिला आहे.
पोलीस कोठडीची मुदत संपल्याने सीबीआयने काळे याला न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सीबीआयचे विशेष सरकारी वकील विजय ढाकणे यांनी केली. बचाव पक्षाचे वकील ऍड. धर्मराज चंडेल यांनी अमोल काळे याला सीबीआयच्या पोलीस कोठडीत असताना एसआयटीने मारहाण केली. तसेच सीबीआयच्या कोठडीत असताना इतर यंत्रणांनी त्याच्याकडे तपास केल्याचे न्यायालयात सांगितले. अमोल काळेला पोलिसांबाबत काही तक्रार आहे का, अशी विचारणा न्यायालयाने केली असता, त्याने आपल्याला पायावर आणि पाठीवर पोलिसांनी मारले असल्याचे सांगितले. मात्र, शुक्रवारी दिवसभरात कोणताही त्रास देण्यात आला नाही, असे सांगितले. त्यानंतर न्यायालयाने अमोल काळेला न्यायालयीन कोठडी सुनावली. याप्रकरणात अटक असलेला आरोपी राजेश बंगेरानेही एसआयटीकडून मारहाण केल्याची तक्रार यापूर्वी न्यायालयात केली आहे. राजेश बंगेरा, अमित दिगवेकरला न्यायालयीन कोठडीत आहेत. तर, एकमेव शरद कळसकर पोलीस कोठडीत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)