दाभोलकर, पानसरे हत्याप्रकरणी 18 नोव्हेंबरपर्यंत आरोपपत्र

सीबीआयची हायकोर्टात माहिती

मुंबई – कॉम्रेड गोविंद पानसरे आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआय 18 नोव्हेंबरपर्यंत आरोपपत्र दाखल करेल, अशी माहिती सीबीआयच्या वतीने अतिरिक्त सॉलीसिटर जनरल अनिल सिंग यांनी आज न्यायालयात दिली. याची दखल घेत न्या एस.सी. धर्माधिकारी आणि बी. पी. कोलाबावाला यांच्या खंडपीठाने सीबीआयचे कान उपटले. आरोपपत्र दाखल होई पर्यंत कोणतीही माहिती प्रसारमाध्यमांसमोर उघडकीस आणू नका असे न्यायालयाने सीबीआयला बजावले.

-Ads-

कॉम्रेड गोविंद पानसरे आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याकांडाची स्वतंत्र यंत्रणांमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी करणाऱ्या विविध याचिका उच्च न्यायालयात दाखल आहेत. तर याप्रकरणी पोलीसांनी अटक केलेल्या विरेंद्र तावडे व समीर गायकवाड यांची पुराव्या अभावी निर्दोष सुटका करण्यात आल्याने त्यालाही आव्हान दिले आहे. त्यावर न्या. सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्या. बी पी कोलाबावाला यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. त्यावेळी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी सीबीआयची बाजू मांडली.

सीबीआयने स्वतः डेडलाईन निश्‍चित केली असून 18 नोव्हेंबरपर्यंत याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले जाणार आहे. तसेच पकडण्यात आलेल्या सात आरोपींना सुरक्षा कोठडीत ठेवण्यात आले आहे, अशी माहिती दिली. तसेच सीबीआय आणि एसआयटीने तपासाचा प्रगती अहवाल कोर्टाला सादर केला याची दखल घेऊन याप्रकरणाची कोणतीही माहिती प्रसारमाध्यमांना देवू नका, असे आदेश एटीएसचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांना दिले. या प्रकरणाची सुनावणी 22 नोव्हेंबरपर्यंत तहकूब ठेवली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)