दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणीला १० ऑक्टोबरपर्यंत स्थगिती 

मुंबई: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर प्रत्यक्ष गोळ्या झाडणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. या संदर्भात मुंबई हायकोर्टाने तपास यंत्रणांना चांगलेच झापले आहे. या प्रकरणी सतत माध्यमांसमोर जाणे चुकीचे असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. तसेच दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणीला १० ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिली आहे.

आज मुंबई हायकोर्टाने डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि पानसरे हत्याकांड प्रकरणी तपास यंत्रणांसह दाभोलकर-पानसरे कुटुंबियांनाही चांगलेच फटकारले. या प्रकरणासंदर्भात तपास यंत्रणा सतत माध्यमांसमोर जात आहे, हे योग्य नसल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे. तसेच दाभोलकर-पानसरे कुटुंबियांनाही कोर्टाने सुनावले. सदर प्रकरणासंदर्भात माध्यमांसमोर जाऊन पुरावे उघड करू नये. अशी तंबी कुटुंबियांना दिली.

हायकोर्टाने एसआयटीला काँ. गोविंद पानसरे हत्यासंदर्भात इतर तपास यंत्रणांवर अवलंबून न राहता स्वतंत्रपणे तपास सुरु ठेवण्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)