दापोली-खेड मार्गावरील भीषण अपघातात पाच ठार 

file photo

दापोली – रत्नागिरी जिल्ह्यात दापोली-खेड मार्गावर शुक्रवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू, तर दोन जण जखमी झाले आहेत. हा अपघात डंपरने एका कारला धडक दिल्याने झाला आहे. मधुकर गंगाराम कांबळे, जगदीश शांताराम पारदुले, महमिदा शेख, मॅक्‍झिमो चालक शेलार अशी मृतांची नावे आहेत. नीलेश पवार आणि संदीप पावसकर हे अन्य दोघेजण गंभीर जखमी असून कांबळे आणि पावसकर दापोली नगर पंचायतीचे कर्मचारी असल्याची माहिती मिळत आहे. दापोली-खेड मार्गावर मॅक्‍सिमो गाडीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या डंपरने धडक दिली.

या अपघातात मॅक्‍झिमो गाडी दुस-या गाडीला ओलांडत असताना समोरून येणा-या डंपरवर आदळली. ही धडक इतकी भीषण होती की पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महामार्गावरील नारपोली गावाजवळील वळणावर हा भीषण अपघात झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)