पिंपरी- भोसरी पोलिसांनी दोघांकडून पाचशे रुपयांच्या सहा नोटा जप्त केल्या आहेत. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी दापोडी येथे फळ विक्रेत्याकडून पाचशे रुपयांची नोट देऊन 50 रुपयांची फळे घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी संशय येताच खबऱ्याने पोलिसांकडे माहिती दिली. यावर भोसरी पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या. यावेळी त्यांच्याकडून पाचशे रुपयांच्या सहा नोटा असे 3 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. संबंधित तरुणांकडून आणखी नकली नोटा आहेत का? किंवा आणखी लोकांचा या प्रकरणात समावेश आहे का? याचा तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)