दापोडी-कासारवाडी मार्गावर वाहतुकीला “रेड सिग्नल’

पिंपरी – जुन्या मुंबई-पुणे मार्गावर अनेक सिग्नल बंद अवस्थेत आहेत. सिग्नलच्या खांबामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने संबंधित विभागाने सिग्नल सुरु करावेत अथवा मुख्य रस्त्यावरुन काढून टाकावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

निगडी ते दापोडी मार्गावर मेट्रोचे काम सुरु असल्याने खोदकाम करत असताना अनेक सिग्नलच्या तारा तुटून सिग्नल बंद पडलेले आहेत. हे सिग्नल वाहतूकीसाठी अडथळे ठरत आहेत. या मार्गावर दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, खराळवाडी या चौकातील सिग्नल बंद असल्याने प्रवासी संभ्रमात पडत आहेत. मुख्य मार्गावर गेल्या सहा महिन्यापासून मेट्रोचे खांब उभारण्याचे काम सुरु आहे. या कामामुळे नव्याने सुरु करण्यात आलेला बीआरटी मार्गही बंद ठेवण्यात आल्याने वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जुन्या मुंबई-पुणे मार्गावर मेट्रोचे खांब उभारण्याचे काम मोरवाडी चौकापर्यंत आले आहे, हे काम निगडीच्या दिशेने जाईल तसे वाहनधारकांच्या अडचणीत भर पडणार आहे. या मार्गावर बंद सिग्नलमुळे वाहतुकीला अडथळा व वाहतूक कोंडी या दोन समस्या निर्माण झालेल्या आहेत. या मधील दापोडी येथील चौकात सिग्नलची आवश्‍यकता नसल्याने तो हटविण्याची आवश्‍यकता आहे. मात्र, कासारवाडी, फुगेवाडी या ठिकाणचे चौक मोठे असल्याने अंतर्गत वाहतूक तसेच पुण्यातून पिंपरी शहरात ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे, ज्या ठिकाणी गरज आहे तेथे सिग्नल बसवावेत व अडथळे निर्माण करणारे व बंद सिग्नल हटविणे सोईस्कर ठरेल.

मेट्रोच्या कामामुळे सिग्नलच्या अंतर्गत असणाऱ्या तारा तुटून काही ठिकाणचे सिग्नल बंद पडलेले आहेत. तसेच, निगडी-दापोडी मार्गावर आवश्‍यक नसलेल्या ठिकाणी सिग्नलचे खांब उभारण्यात आले असून सद्यस्थितीत ते बंद आहेत. यामुळे, संबंधित विभागाने वाहतुकीला अडथळे ठरणारे सिग्नलचे खांब काढण्याची गरज आहे. तसेच, ज्या चौकात वाहतूक कोंडी होते अशा ठिकाणी पोलिसांची नेमणूक करण्याची आवश्‍यकता आहे.
श्‍याम सूर्यवंशी, प्रवासी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)